'जया अमिताभ बच्चन' असा उल्लेख होताच त्या संतापल्या, पुढे जे घडलं ते...

Edited by Harshada J S Image credit: ANI
30/07/2024

राज्यसभेत उपसभापती हरिवंश यांनी 'जया अमिताभ बच्चन' असा उल्लेख करताच समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन संतापल्या. 

Image credit: PTI
30/07/2024

तुम्ही केवळ जया बच्चन असे म्हटले असते तरीही चालले असते, असे म्हणत जया यांनी आपला आक्षेप नोंदवला. 

Image credit: ANI 30/07/2024

उपसभापतींनीही यास उत्तर देत म्हटले की, 'येथे पूर्ण नाव लिहिलेले आहे, म्हणूनच मी तसा उल्लेख केला'.

Image credit: ANI 30/07/2024

उपसभापतींच्या उत्तरावर जया पुन्हा संतापून म्हणाल्या की, 'हा जो नवा प्रकार सुरू झालाय, त्यामुळे महिला पतीच्या नावानेच ओळखल्या जातील. जसे काय त्यांचे अस्तित्व- कर्तृत्वच नाही'

30/07/2024
Image credit: ANI

बॉलिवूडनंतर जया बच्चन राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आहेत.

Image credit: PTI 30/07/2024

जया बच्चन या पाचव्यांदा समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. 

Image credit: ANI 30/07/2024

जया बच्चन संसदेमध्ये महिलांचे प्रश्न सातत्याने मांडत असतात आणि हेच पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

Image credit: ANI 30/07/2024

आणखी वाचा

नशीब चमकले! मजुराला खाणीत सापडला 80 लाखांचा हिरा

marathi.ndtv.com