Samruddhi Express Highway: समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचेही काम पूर्ण, उद्घाटन कधी होणार ?

Edited by Harshada J S Image credit: MSRDC
Image credit: MSRDC

मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम वर्ष 2018 साली सुरू झाले होते. 

Image credit: MSRDC

710 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलंय. 

Image credit: MSRDC

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले आहे, लवकरच मार्गाचे उद्घाटन होणार आहे.

Image credit: MSRDC

मुख्यमंत्री असताना कामाचा शुभारंभ आणि मुख्यमंत्री असतानाच उद्घाटन असा दुर्मीळ योगायोग देवेंद्र फडणवीसांना साधता आलाय.

Image credit: MSRDC

या महामार्गाची एकूण लांबी 710 किलोमीटर असून यापैकी 625 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आला होता. 

Image credit: MSRDC

इगतपुरी ते मुंबईदरम्यानच्या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचे काम बाकी होते जे आता पूर्ण झाले आहे. 

Image credit: MSRDC

या महामार्गावरील शेवटच्या टप्प्यात असलेला 8 किलोमीटर लांबीचा बोगदा हे मोठे आकर्षण आहे. 

Image credit: MSRDC

या बोगद्यामुळे 12 किलोमीटरचा कसाऱ्याचा घाट टाळता येणार असून हे अंतर अवघ्या 8 मिनिटांत कापता येणं शक्य होणार आहे. 

Image credit: MSRDC

समृद्धी महामार्ग हा 6 लेनचा मार्ग असून याची रुंदी 120 मीटर इतकी आहे.

Image credit: MSRDC

समृद्धी महामार्गा हा देशातील सर्वात अत्याधुनिक एक्स्प्रेस वे असल्याचे म्हटले जात आहे. 

Image credit: MSRDC

या महामार्गावरून ताशी 150 किमी वेगाने गाडी चालवण्यास परवानगी आहे. 

Image credit: MSRDC

समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर 16 तासांऐवजी केवळ 8 तासांत कापता येईल.

Image credit: MSRDC

या महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे, वाहने तसेच पादचाऱ्यांसाठी ठिकठिकाणी अंडरपास आहेत. 

Image credit: MSRDC

समृद्धी महामार्गाच्या बांधणीचा एकूण खर्च 67,000 कोटी रुपये इतका झाला आहे. 

Image credit: MSRDC

या महामार्गामुळे राज्यातील 10 जिल्हे प्रत्यक्ष आणि 14 जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडले गेले आहेत.

Image credit: MSRDC

दोन वर्षांत या महामार्गावरून 1.52 कोटी वाहनांनी प्रवास केला असून टोलद्वारे 1,100 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झालेत. 

आणखी वाचा

'मीही शीश महाल बांधू शकलो असतो, पण...' PM मोदींचा AAPवर निशाणा

marathi.ndtv.com