Samruddhi Mahamarg:
समृद्धी महामार्गावर कुंपणात अडकलेल्या बिबट्याचे Rescue Operation Photos
समृद्धी महामार्गावर नागपूर जिल्ह्यातील वायफळ टोल नाक्याजवळ बिबट्या अडकला होता.
टोल नाक्याजवळ अडकलेल्या बिबट्याची सुटका करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
टोल नाक्याजवळ कुंपणाच्या तारेमध्ये बिबट्या अडकला होता.
गोरेवाडा येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरची संपूर्ण रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली होती.
मोठे प्रयत्न केल्यानंतर बिबट्याची अखेर सुटका करण्यात आली.
बिबट्याची सुखरुप सुटका केल्यानंतर त्याला अॅम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले.
किरकोळ जखमी असलेल्या बिबट्याला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाथे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत बिबट्याचे रेस्क्यु ऑपरेशन पार पडले.
आणखी वाचा
पुणे हादरले! आईनेच 2 महिन्यांच्या जुळ्या मुलांना फेकले पाण्याच्या टाकीत
marathi.ndtv.com