कुंड्या फोडल्या-दगडफेक केली, अल्लु अर्जुनच्या घरावर हल्ला Photos
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
संध्या थिएटर चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या महिलेला न्याय देण्याची मागणी करत काही लोकांनी अल्लु अर्जुनच्या घरावर हल्ला केला.
Image credit: PTI
मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
Image credit: PTI
हल्ला करणाऱ्यांनी अर्जुनच्या घरातील रोपांच्या कुंड्यांसह अन्य गोष्टींची तोडफोड केली.
Image credit: PTI
काही लोकांनी भिंतीवर चढून त्याच्या घरामध्ये टोमॅटोही फेकले. दरम्यान हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलीय.
Image credit: PTI
पोलिसांची परवानगी नसतानाही अल्लु अर्जुन 4 डिसेंबरला संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता, असा आरोप तेलंगणाचे CM ए. रेवंत रेड्डी यांनी केलाय.
Image credit: PTI
आरोपांनंतर अल्लुने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप नाकारले.
Image credit: PTI
पोलिसांची परवानगी नसती तर आम्हाला माघारी जाण्यास सांगितले असते. मी कायद्याचे पालन करणारा व्यक्ती आहे : अल्लु अर्जुन
Image credit: PTI
मी पोलिसांच्या सूचनांचं पालन करत होता आणि हा रोड शो नव्हता, असे म्हणत अल्लुने आरोप फेटाळून लावले.
बरीच चुकीची माहिती पसरवली जातेय आणि हे आरोप खोटे आहेत. चारित्र्यहनन केले जात असल्याचेही अल्लुने म्हटले.
आणखी वाचा
श्रेयस तळपदेच्या जीवनात ‘पुष्पा'ची एण्ट्री कशी झाली?
marathi.ndtv.com