Dead On Arrival डेड ऑन अरायव्हल म्हणजे काय?
Edited by Harshada J S
Image credit: Shefali Jariwala Insta
Image credit: Shefali Jariwala Insta
'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाचे शुक्रवारी (27 जून) रात्री निधन झाले.
Image credit: Shefali Jariwala Insta
शेफालीची प्रकृती बिघडल्यानंतर पती पराग त्यागीने तिला बेलव्ह्यू मल्टीस्पेशअॅलिटी हॉस्पिटलमध्ये नेले.
Image credit: Shefali Jariwala Insta
पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
Image credit: Shefali Jariwala Insta
रिपोर्ट्सनुसार कार्डिअॅक अरेस्टमुळे शेफाली जरीवालाचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जातंय.
Image credit: Shefali Jariwala Insta
शेफालीच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय.
Image credit: Shefali Jariwala Insta
हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी शेफालीला 'डेड ऑन अरायव्हल' घोषित केले होते.
Image credit: Shefali Jariwala Insta
'डेड ऑन अरायव्हल' म्हणजे नेमके काय, हे जाणून घेऊया...
Image credit: Shefali Jariwala Insta
डेड ऑन अरायव्हल म्हणजे एखाद्या रुग्णाचा वैद्यकीय सुविधेत किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झालेला असतो.
Image credit: Shefali Jariwala Insta
अशा व्यक्तीला पुन्हा जिवंत करणे शक्य नसते, त्या स्थितीस वैद्यकीय भाषेत 'डेड ऑन अरायव्हल' असे म्हणतात.
Image credit: Shefali Jariwala Insta
2002मध्ये 'कांटा लगा' या रीमिक्स गाण्यामुळे शेफाली लोकप्रिय झाली होती.
Image credit: Shefali Jariwala Insta
शेफालीने 'नच बलिए' आणि यानंतर 'बिग बॉस 13' यासारख्या रिअॅलिटी शोद्वारे लोकप्रियता मिळवली होती.
Image credit: Shefali Jariwala Insta
आठवडाभरापूर्वी शेफालीने शुटिंगसाठी तयार होत असतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.
Image credit: Shefali Jariwala Insta
'आता वेळ आलीय की आपण आयुष्य जगायला सुरुवात करावी. जणू काही प्रत्येक गोष्ट आपल्या बाजूने घडतेय', असे कॅप्शन तिने व्हिडीओला दिले होते.
Image credit: Shefali Jariwala Insta
शेफालीने वयाच्या 42व्या वर्षी अचानक जगाचा निरोप घेतल्याने सर्वांचा धक्का बसलाय.
आणखी वाचा
तारक मेहताच्या जेठालालची खरी Daya पाहिलीय का?
marathi.ndtv.com