शिमल्याच्या मशिदीतील अवैध बांधकामाविरोधात आंदोलन, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

Edited by Harshada J S Image credit: ANI
Image credit: ANI

शिमलामधील संजौली भागातील मशिदीच्या आतमध्ये झालेल्या अवैध बांधकामांचा प्रश्न अधिक चिघळलाय.

Image credit: ANI

मशीद प्रकरणावरून बुधवारी (11 सप्टेंबर 2024) पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. 

Image credit: ANI

हिंदू संघटनांचे आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलिसांनी उभारलेले बेरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.

Image credit: ANI

पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कलम 163 लागू केले आहे.

Image credit: ANI

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 

Image credit: ANI

संजौली भागात कोणत्याही परवानगीशिवाय मशिदीमध्ये अवैध बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Image credit: ANI

हे बांधकाम पूर्णपणे अवैध असून त्यास परवानगी देऊ नये, असे स्थानिकांचे मत आहे. 

Image credit: ANI

1947 साली बांधण्यात आलेल्या या मशिदीचे 2010साली पुनर्निर्माण करण्यात आले, याच वेळेस येथे अवैध बांधकाम करण्यात आले; असा आरोप करण्यात येत आहे.

Image credit: ANI

शिमला नगरपालिकेने अवैध बांधकामाबाबत अनेकदा नोटीस बजावली आहे. त्यानंतरही हे काम थांबवण्यात आले नाही. 

Image credit: ANI

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 2010 साली फक्त एक मजली मशीद होती. पण हळू-हळू त्यावरील मजले वाढवण्यात आले. आता ही मशीद बहुमजली झाली आहे. 

आणखी वाचा

माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक

marathi.ndtv.com