ACमुळे त्वचेवर होतो परिणाम? जाणून घ्या रामबाण उपाय

Image credit: Canva Edited by Harshada J S

ACमुळे जीवघेण्या उन्हाळ्यामध्ये काहीसा दिलासा मिळतो. 

Image credit: Canva

पण एसीच्या अति वापरामुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Image credit: Canva

एसीमुळे हवेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे त्वचा कोरडी व निर्जीव होऊ शकते. त्यामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. 

Image credit: Canva

एसीच्या संपर्कात अधिक काळ राहिल्यास त्वचा कोरडी होऊन त्वचेला खाज सुटणे-त्वचा लाल होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

त्वचा कोरडी झाल्यास त्वचेवरील सीबमचा स्त्राव वाढतो. यामुळे ब्लॅकहेड्स व मुरुमांची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

कोरड्या त्वचेमुळे सुरकुत्यांची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

एसीमुळे त्वचेवर होणाऱ्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी रुममध्ये ह्युमिडिफायरचा वापर करावा आणि ह्युमिडिटीची पातळी 40-50% टक्क्यांदरम्यान ठेवावी. 

Image credit: Canva

त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरावे. आंघोळ केल्यानंतर त्वचेवर लगेचच मॉइश्चरायझर लावा. 

Image credit: Canva

एसीमध्ये शरीर हायड्रेट राहावे, यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Health Tips: ही हिरवी थंडगार पाने खाण्याचे 5 मोठे फायदे

marathi.ndtv.com