सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, कारचा झाला चेंदामेंदा
Edited by Harshada J S Image credit: Sonu Sood Insta Image credit: ANI गरीब-गरजूंची मदत करणारा अभिनेता सोनू सूदच्या चाहत्यांसाठी वाईट वृत्त आहे.
सोनू सूदची पत्नी सोनाली सूदच्या कारचा भीषण अपघात झालाय. अपघातात ती जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.
सोनाली वहिनी आणि पुतण्यासोबत प्रवास करत ट्रकने मागील बाजूने त्यांच्या कारला धडक दिल्याने अपघात घडला.
Image credit: ANI हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, सोनालीचा पुतण्या गाडी चालवत होता आणि दुर्घटनेत त्यालाही दुखापत झालीय.
सोमवारी (24 मार्च) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास नागपुरात सोनालीचा अपघात झाला.
Image credit: ANI अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय.
Image credit: ANI Image credit: Sonu Sood Insta सोनाली आणि तिच्या भाच्यावर नागपुरातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत.
Image credit: Sonu Sood Insta अपघाताची माहिती मिळताच सानू सूद तातडीने नागपुरात दाखल झाला.
Image credit: Sonu Sood Insta पुढील 48-72 तासांपर्यंत सोनाली आणि तिच्या भाच्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाईल, असे मेडिकल स्टाफने सांगितलंय.
आणखी वाचा
शिंदे गटाकडून 500 फोन आले, मला कापण्याची धमकी! कुणाल कामराची NDTVला प्रतिक्रिया
marathi.ndtv.com