गोल्डन बॉय नीरज चोप्राचा भारतीय सैन्याकडून सन्मान, मोठी पदवी प्रदान 

Edited by Harshada J S Image credit: Neeraj Chopra Insta
Image credit: Neeraj Chopra Insta

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचा भारतीय सैन्याकडून मोठा सन्मान करण्यात आलाय. 

सैन्याकडून नीरजला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी प्रदान करण्यात आलीय.

Image credit: Neeraj Chopra Insta

नीरज चोप्राची लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्ती 16 एप्रिल 2025 पासून लागू झाली आहे.

Image credit: Neeraj Chopra Insta

नीरजला यापूर्वी 26 ऑगस्ट 2016 रोजी सैन्यामध्ये नायब सुभेदारच्या पदावर ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नामांकित करण्यात आले होते. 

Image credit: Neeraj Chopra Insta

2018 मध्ये नीरजला अर्जुन पुरस्कार आणि 2021 मध्ये विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते. 

Image credit: Neeraj Chopra Insta

2021मध्येच नीरजची सुभेदार पदावर बढती करण्यात आली होती. 

Image credit: Neeraj Chopra Insta

नीरज चोप्राने टोकिया ऑलिम्पिकमध्ये भाला फेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून इतिहास रचला होता. 

Image credit: Neeraj Chopra Insta
Image credit: IANS

पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये त्याने रौप्य पदक पटकावले होते. 

आणखी वाचा

खूश आहेस... प्रेमानंद महाराजांनी विचारल्यानंतर विराट कोहली काय म्हणाला?

marathi.ndtv.com