बंगळुरू स्टेडिअमजवळ चेंगराचेंगरी, दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने IPL 2025 फायनल मॅच जिंकली. 

Image credit: PTI

यानिमित्ताने टीमचा सत्कार करण्यासाठी खास बंगळुरूमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Image credit: PTI

चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये टीमचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पण या सोहळ्यास गालबोट लागलं. 

Image credit: PTI

क्रिकेटप्रेमींनी स्टेडिअम परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. 

Image credit: PTI

चेंगराचेंगरीमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: PTI

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनतर्फे स्टेडिअममध्ये RCB टीमसाठी विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

Image credit: PTI

यावेळेस झालेली गर्दीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, असे म्हटलं जातंय. 

Image credit: PTI

मोठ्या संख्येमध्ये क्रिकेटप्रेमी स्टेडिअममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.

Image credit: PTI

चाहत्यांची गर्दी नियंत्रित करताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत होता. 

Image credit: PTI

दरम्यान स्टेडिअममध्ये तिकीट-पास असणाऱ्यांना प्रवेश मिळणार, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले होते. पण तरीही चाहत्यांनी गर्दी केली.

आणखी वाचा

आनंदाश्रू, भावुक क्षण.. अन् विरुष्काने उचलली ट्रॉफी PHOTOS

marathi.ndtv.com