राज्यसभेच्या पहिल्या भाषणामध्ये सुधा मूर्तींनी या गोष्टींचा केला उल्लेख

Edited by Harshada J S Image credit: ANI
04/07/2024

लेखिका व समाजसेविका सुधा मूर्ती यांनी संसदेची सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्यसभेत पहिल्यांदा भाषण केले.

Image credit:  PTI
04/07/2024

 महिलांना सर्व्हाइकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

Image credit: ANI
04/07/2024

पर्यटनाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, भारतात 42 वारसा स्थळ आहेत, ज्यांचा कधीही प्रचार-प्रसार केला गेला नाही तसेच लोकांना या जागांबाबत फारशी माहितीही नाही. 

Image credit: ANI
04/07/2024

सुधा मूर्तींनी सांगितले की दक्षिणीकडील राज्यांत असे कित्येक ठिकाणं आहेत, ज्यांचा इतिहास गौरवशाली आहे. 

Image credit: ANI
04/07/2024

त्रिपुरातील उनाकोटीबाबत कोणालाही माहिती नाही, हे ठिकाण 12,500 वर्षांहून अधिक पुरातन आहे. 

Image credit: xyz
04/07/2024

काश्मीरमधील मुगल गार्डनचाही वारसा स्थानांच्या यादीत समावेश नाही. याकडे लक्ष दिले गेले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

Image credit: xyz
04/07/2024

गुजरातमधील लोथल-धौलावीरा, वाराणसीतील सारनाथ, मध्य प्रदेशातील मांडू किल्ला या ठिकाणांचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की आपल्या सुंदर देशामध्ये काय नाहीय?

Image credit: PTI
04/07/2024

मूर्तींनी असे म्हटले की, आपल्याला याचा प्रचार करायला हवा. येथे सुविधा उपलब्ध करायला हव्यात आणि या ठिकाणांबाबत जागरूकता पसरवायला हवी.

Image credit: IANS
04/07/2024

आणखी वाचा

भारतातील सर्वाधिक महागडे शहर

marathi.ndtv.com