उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी उपाय, मुंबई मनपाने जारी केल्या सूचना

Edited by Harshada J S Image credit: Canva

उन्हाळ्यामध्ये वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघातासारखे प्रकार होऊ नये, यासाठी मुंबई मनपाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

Image credit: Canva

वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नेमके काय आवाहन केलंय, जाणून घेऊया... 

Image credit: Canva

तहान नसेल तरीही पुरेसे पाणी प्यावे. प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवा.

Image credit: Canva

हलके, सौम्य, फिक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट वापरा.

Image credit: Canva

मद्यपान, चहा, कॉफी, शीतपेये पिणे टाळा, कारण त्याद्वारे शरीराचे निर्जलीकरण होते.

Image credit: Canva

उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.

Image credit: Canva

तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास सुती कापडाने डोके आणि चेहरा झाका. 

Image credit: Canva

तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.

Image credit: Canva

पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.

Image credit: Canva

तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या. 

Image credit: Canva

ORS, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेय प्या. यामुळे शरीराला हायड्रेट राहील.

Image credit: Canva

जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.

Image credit: Canva

तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.

Image credit: Canva

  वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Jaggery Benefits : रात्री झोपण्यापूर्वी गूळ का खावे?

marathi.ndtv.com