सुप्रिया सुळे 'भावी मुख्यमंत्री', बारामतीत बॅनरबाजी
Edited by Harshada J S
बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सु्प्रिया सुळे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे युवक जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाभाई बागवान यांनी हे बॅनर झळकावले आहेत.
दुसरीकडे युगेंद्र पवार यांचाही बॅनर झळकवण्यात आला असून त्यावर 'फिक्स आमदार' असे लिहिण्यात आले आहे.
Image credit: Yugendra Pawar X
विधानसभा निवडणुकीत शरद पवार युगेंद्र पवार यांना अजित पवारांविरोधात उभे करणार असल्याची चर्चा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही बॅनरबाजी करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.
Image credit: Vijay Wadettiwar X
सत्ता मविआचीच येणार. मुख्यमंत्री कोण होईल? हे मविआचे नेते ठरवतील व निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.
मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे; असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
Image credit: Vijay Wadettiwar X
आणखी वाचा
CM शिंदेंच्या हस्ते 'स्वच्छता ही सेवा' अभियानाचा शुभारंभ
marathi.ndtv.com