स्वराज्यरक्षक संभाजी फेम प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या अहोंचा फोटो पाहिला का?

Edited by Harshada J S Image credit: Prajakta Gaikwad Insta
Image credit: Prajakta Gaikwad Insta

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा सोहळा पार पडलाय. 

Image credit: Prajakta Gaikwad Insta

प्राजक्ताने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांनी ही गोड बातमी दिलीय. 

Image credit: Prajakta Gaikwad Insta

प्राजक्ताचा होणारा नवरा कोण आहे, तो काय करतो, त्याचे नाव काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची चाहत्यांना उत्तरं जाणून घ्यायची होती. 

Image credit: Prajakta Gaikwad Insta

अखेर प्राजक्ताने होणाऱ्या नवऱ्यासोबतचे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. 

Image credit: Prajakta Gaikwad Insta

प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या पतीचे नाव शंभुराज असे आहे.

Image credit: Prajakta Gaikwad Insta

प्राजक्ताने ऑनस्क्रीन महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. 

Image credit: Prajakta Gaikwad Insta

प्राजक्ताच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचेही नाव शंभुराज असल्याचा सुंदर योगायोग जुळून आलाय. 

Image credit: Prajakta Gaikwad Insta

प्राजक्ताने शंभुराजसोबतचे फोटो जरी शेअर केले असले तरीही त्याच्याबाबत फारशी माहिती सांगणे टाळलंय. 

Image credit: Prajakta Gaikwad Insta

प्राजक्ताने साखरपुड्यासाठी खास लुकची निवड केली होती. 

Image credit: Prajakta Gaikwad Insta

लाल-पांढऱ्या रंगाची साडी, सुंदर हेअरस्टाइल, मेंदी, नॅचरल मेकअप लुकमुळे प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती. 

Image credit: Prajakta Gaikwad Insta

चाहत्यांकडून प्राजक्ता आणि शंभुराजवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. 

Image credit: Prajakta Gaikwad Insta

1 ऑगस्टला प्राजक्ताने कुंकवाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 

आणखी वाचा

ज्यांना समजायचंय ते समजून घेतील, हिंदीत बोल म्हटल्यावर काजोल असं का म्हणाली?

marathi.ndtv.com