हेड कोच द्रविडला टीम इंडिया देणार का विजयी सेंडऑफ?

Edited by  Prathmesh D Image credit: Rahul Dravid FB
29/06/2024

आज होणारी टी-20 वर्ल्डकप फायनल टीम इंडियासाठी आणखी एका कारणाने खास असणार आहे.

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

हेड कोच राहुल द्रविडचा हा भारतीय संघासाठी शेवटचा सामना असणार आहे.

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

 राहुल द्रविड भारतीय संघाचा कोच होण्याच्या शर्यतीत नसणार आहे. त्यामुळे द्रविडसाठी टीम इंडियाने हा वर्ल्डकप जिंकावा असा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच टीम इंडियाने WTC Final आणि ODI World Cupची अंतिम फेरी गाठली. पण दोन्ही स्पर्धांमध्ये भारताला विजयाने हुलकावणी दिली.

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

त्यामुळे टी-20 वर्ल्डकप जिंकून राहुल द्रविडला विजयी सेंड ऑफ देण्याची मागणी चाहते सोशल मीडियावर करत आहेत.

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली याआधी टीम इंडियाने आशिया कप आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे.

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

Team India चा हेड कोच म्हणून राहुल द्रविडचा परफॉर्मन्स कसा राहिला आहे, यावर एक नजर टाकुया...

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

कसोटी क्रिकेट - 24 सामने, 14 विजय, 7 पराभव, 3 अनिर्णित, 58.33 टक्के सक्सेस रेट

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

वन-डे क्रिकेट - 53 सामने, 36 विजय, 14 पराभव, 3 अनिर्णित, 72 टक्के सक्सेस रेट

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

टी-20 क्रिकेट - 70 सामने, 51 विजय, 16 पराभव, 2 सामने बरोबरीत, 1 सामना अनिर्णित, 75.36 टक्के सक्सेस रेट

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

एकूण  - 147  सामने, 101 विजय, 37 पराभव, 2 बरोबरीत, 7 अनिर्णित, 68.70 टक्के सक्सेस रेट

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

आयसीसी स्पर्धांमध्ये राहुल द्रविडचा कोच म्हणून परफॉर्मन्स कसा राहिला यावर नजर टाकुया...

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

कसोटी - 1 सामना, 1 पराभव
वन-डे - 11 सामने, 10 विजय, 1 पराभव

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

टी-20 - 16 सामने, 14 विजय, 2 पराभव
एकूण - 28 सामने, 24 विजय, 4 पराभव

29/06/2024 Image credit: Rahul Dravid FB

आणखी वाचा

बापरे! हार्दिक पांड्याच्या नावे आहे इतकी संपत्ती

marathi.ndtv.com