RJD नेते तेजस्वी यादव दुसऱ्यांदा झाले बाबा, मुलाचे PHOTO पाहिले का?

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि त्यांची पत्नी राजश्री मंगळवारी (27 मे) दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. 

Image credit: PTI

राजश्री यांनी कोलकातामधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिलाय.

Image credit: PTI

तेजस्वी यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बाबा झाल्याची गुड न्यूज शेअर केली.

Image credit: PTI

सुप्रभात, अखेर प्रतीक्षा संपली! आमच्या मुलाच्या आगमनाची घोषणा करताना खूप आनंदी वाटत आहे. जय हनुमान!, असे पोस्ट तेजस्वी यांनी शेअर केलंय. 

Image credit: PTI

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही तेजस्वी यादव आणि त्यांच्या पत्नीची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

Image credit: PTI

ममता बॅनर्जी यांनी तेजस्वी आणि त्यांची पत्नी राजश्री यांचे अभिनंदन केले.

Image credit: Rabri Devi X

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांनीही नातवाची भेट घेतल्याचा फोटो शेअर केला आहे.

Image credit: Rabri Devi X

तेजस्वी यादव यांना मुलगा झाल्याची बातमी कळताच कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Image credit: Rabri Devi X

हाजीपूरमध्ये राजद कार्यकर्त्यांनी हनुमान मंदिरात पूजा करुन लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना केली. 

आणखी वाचा

PM नरेंद्र मोदींसाठी 26 मे ही तारीख अतिशय खास आहे, कारण..

marathi.ndtv.com