Tirupati Stampede: तिरुपतीमध्ये दर्शनाचे तिकीट मिळवताना मंदिरात चेंगराचेंगरी, 9 भाविकांचा मृत्यू

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये 8 जानेवारीला रात्रीच्या वेळेस चेंगराचेंगरी झाली. 

Image credit: PTI

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरमध्ये नऊ भाविकांचा मृत्यू झालाय तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Image credit: PTI

वैकुंठद्वार दर्शनमचे तिकीट मिळवण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती, यादरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. 

Image credit: PTI

तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (TTD) अध्यक्ष बीआर नायडू यांनी सांगितले की, पोलिसांनी गेट उघडले आणि भाविक थेट आत आले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. 

अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही नायडू यांनी सांगितले.

Image credit: PTI
Image credit: PTI

मंदिरामध्ये 10 जानेवारीपासून 10 दिवसीय वैकुंठद्वार दर्शनमसाठी शेकडो भाविक येथे दाखल झाले आहेत.

Image credit: PTI

मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी 'X' वर या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. 

Image credit: PTI

मंदिर प्रशासनाकडून चूक झालीय आणि कडक कारवाईही केली जाईल, असेही टीटीडी बोर्डचे सदस्य भानू प्रकाश यांनी सांगितले.

आणखी वाचा

कोळसा खाणीत अडकले 9 कामगार, 3 दिवसांनंतर एकाचा सापडला मृतदेह

marathi.ndtv.com