भारतातील सर्वाधिक थंड तापमानाची 8 ठिकाणे, जूनमध्येही असते 1 डिग्रीतापमान
Edited by Harshada J SImage credit: Canva
22/06/2024
लडाखमध्ये तापमानाचा पारा -30 डिग्रीपर्यंत पोहोचतो. जून महिन्यातील कडक उन्हामध्येही येथील तापमान 1 ते 2 डिग्री असते.
22/06/2024Image credit: Canva
हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक थंड तापमान असणाऱ्या ठिकाणांच्या यादीत स्पिती व्हॅलीचाही समावेश आहे. जून महिन्यात येथे रात्रीच्या वेळेस तापमान 3 ते 4 डिग्री असते.
22/06/2024Image credit: Canva
जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे वर्षभर बर्फवृष्टी होत असते. जून महिन्यात येथे तापमान 5 ते 6 डिग्री असते.
22/06/2024Image credit: Canva
जम्मू-काश्मीरमधील आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे अल्ची. जून महिन्यात येथील तापमान 7 ते 8 डिग्री असते.
22/06/2024Image credit: Canva
उंच-उंच पर्वतरांगाचे सुंदर ठिकाण म्हणजे सोनमर्ग. येथील पर्वतरांगा बर्फाने आच्छादलेल्या असतात. जून महिन्यात येथील तापमान 8 ते 9 डिग्री असते.
22/06/2024Image credit: Canva
स्पितीजवळील आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे केलांग. जून महिन्यात रात्रीच्या वेळेस येथील तापमान 2 ते 3 डिग्रीपर्यंत असते.
22/06/2024Image credit: Canva
हिमाचलमधील कुल्लू आणि लाहौल घाटीदरम्यान रोहतांग पास हा पर्वतीय भाग आहे. जूनमध्ये रात्रीच्या वेळेस येथील तापमान 1 ते 2 डिग्री इतके असते.
22/06/2024Image credit: Canva
शाल आणि टोप्यांसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण म्हणजे किनौर. येथे जून महिन्यात 5 ते 7 डिग्री तापमान असते.