नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी
Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde Insta Image credit: CM Eknath Shinde Insta नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची शुक्रवारी (11 ऑक्टोबर) यशस्वी चाचणी पार पडली.
Image credit: CM Eknath Shinde Insta मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली.
Image credit: CM Eknath Shinde Insta वायुदलाचे सी-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरवण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली.
Image credit: CM Eknath Shinde Insta यावेळेस लढाऊ सुखोई -30 (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले.
Image credit: CM Eknath Shinde Insta नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.
Image credit: CM Eknath Shinde Insta लँडिंग करणाऱ्या सी-295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Image credit: CM Eknath Shinde Insta सी-295 विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आले होते.
Image credit: CM Eknath Shinde Insta आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
Image credit: CM Eknath Shinde Insta मार्च 2025मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू करण्यात येईल, असेही CM शिंदेंनी म्हटले.
Image credit: CM Eknath Shinde Insta महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव
marathi.ndtv.com