बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी या 7 खास साड्यांची केली निवड 

Edited by Harshada J S Image credit: xyz
23/07/2024

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पावर सर्वांचे लक्ष होतेच पण आपण एकदा त्यांच्या साड्यांवरही नजर टाकुया. 

Image credit: PTI
23/07/2024

दरवर्षीप्रमाणे यंदाही सीतारमण सुंदर साडी नेसून संसदेत दाखल झाल्या होत्या.

Image credit: PTI
23/07/2024

2019मध्ये अर्थमंत्री म्हणून पहिले बजेट सादर करताना सीतारमण यांनी गुलाबी रंगाची मंगलागिरी सिल्क साडी नेसली होती. सोनेरी रंगाचे बॉर्डर हे या साडीचे वैशिष्ट्य होते. 

23/07/2024

2020मध्ये त्यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. 

23/07/2024

2021मध्ये त्यांनी लाल-पांढऱ्या रंगाची खास डिझाइनची साडी नेसून बजेट सादर केले होते.

23/07/2024

2022मध्ये सीतारमण तपकिरी-गोल्डन रंगाची साडी नेसून संसदेत पोहोचल्या होत्या. अशा पद्धतीची साडी ओडिशातील बोमकाई गावामध्ये तयार केली जाते. 

23/07/2024

2023मध्ये त्यांनी लाल-काळ्या रंगाच्या इलकल सिल्क साडीची निवड केली होती. या साडीवर नवलगुंडा एम्ब्रॉयडरी डिझाइन होते. 

23/07/2024

2024मध्ये अंतरिम बजेट सादर करताना सीतारमण यांनी आकाशी रंगाची सिल्क साडी नेसली होती. यावर सुंदर कांथा एम्ब्रॉयडरी डिझाइन होते.

Image credit: ANI
23/07/2024

2024-25 वर्षाचे बजेट सादर करताना सीतारमण यांनी पांढऱ्या-जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. पदरावर सोनेरी रंगाचे कमळाचे सुंदर डिझाइन होते. 

Image credit: PTI
23/07/2024

आणखी वाचा

भारत सरकार दरवर्षी बजेट का सादर करते?

marathi.ndtv.com