सरकार दरवर्षी बजेट का सादर करते?

Edited by Harshada J S Image credit: PTI

भारत सरकार दरवर्षी बजेट सादर करते आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच वर्ष 2024-25साठीचे बजेट सादर करणार आहेत.

Image credit: ANI

हे बजेट सरकारच्या उत्पन्न-खर्चाचे तपशीलवार वर्णन असते. म्हणजे आगामी काळात कसे उत्पन्न कमावणार व कुठे खर्च केला जाणार, याची माहिती बजेटमध्ये मांडली जाते. 

Image credit: ANI

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बजेट म्हणजे देशाचे उत्पन्न व खर्चाची योजना असते.

Image credit: Canva

याशिवाय कुठे कोणत्या नव्या गोष्टी निर्माण करायच्या किंवा कोणत्या क्षेत्रात टॅक्स वाढवायचा अथवा घटवून पैसा जोडायचा? याबाबतचाही निर्णय घेतला जातो. 

Image credit: Canva

सरकारकडून टॅक्सपासून ते इलेक्ट्रॉनिक्स, सोने-चांदी, खाद्यपदार्थ, कपडे, घर इत्यादी गोष्टींवरील टॅक्सबाबतची माहितीही बजेटमध्ये सांगितली जाते. 

Image credit: Canva

बजेटमधील घोषणांनुसार भविष्यात काय खरेदी करायचे किंवा काय करणे टाळावे, याची योजना सर्वसामान्य आखतात. 

Image credit: PTI

www.indiabudget.gov.in या वेबसाइटवर इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये बजेट उपलब्ध असते. 

Image credit: PTI

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण 

marathi.ndtv.com