बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी या 7 खास साड्यांची केली निवड
Edited by Harshada J SImage credit: PTI
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 23 जुलै 2024 रोजी संसदेत सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पावर सर्वांचे लक्ष होतेच पण आपण एकदा त्यांच्या साड्यांवरही नजर टाकुया.
Image credit: PTI
23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळेसही सीतारमण सुंदर साडी नेसून संसदेत दाखल झाल्या होत्या.
Image credit: PTI
2019मध्ये अर्थमंत्री म्हणून पहिले बजेट सादर करताना सीतारमण यांनी गुलाबी रंगाची मंगलागिरी सिल्क साडी नेसली होती. सोनेरी रंगाचे बॉर्डर हे या साडीचे वैशिष्ट्य होते.
2020मध्ये त्यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
2021मध्ये त्यांनी लाल-पांढऱ्या रंगाची खास डिझाइनची साडी नेसून बजेट सादर केले होते.
2022मध्ये सीतारमण तपकिरी-गोल्डन रंगाची साडी नेसून संसदेत पोहोचल्या होत्या. अशा पद्धतीची साडी ओडिशातील बोमकाई गावामध्ये तयार केली जाते.
2023मध्ये त्यांनी लाल-काळ्या रंगाच्या इलकल सिल्क साडीची निवड केली होती. या साडीवर नवलगुंडा एम्ब्रॉयडरी डिझाइन होते.
2024मध्ये अंतरिम बजेट सादर करताना सीतारमण यांनी आकाशी रंगाची सिल्क साडी नेसली होती. यावर सुंदर कांथा एम्ब्रॉयडरी डिझाइन होते.
Image credit: ANI
2024-25 वर्षाचे बजेट सादर करताना सीतारमण यांनी पांढऱ्या-जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. पदरावर सोनेरी रंगाचे कमळाचे सुंदर डिझाइन होते.