उत्तर प्रदेशात एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले,
4 प्रवाशांचा मृत्यू
Edited by Harshada J S Image credit: ANI 18/07/2024
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यामध्ये गुरुवारी (18 जुलै) चंदिगड-दिब्रुवाडी एक्सप्रेसचे आठ डबे मोतीगंज-झिलाही रेल्वे स्टेशनदरम्यान रुळावरून घसरले.
18/07/2024 Image credit: ANI
अपघातामध्ये चार लोकांचा मृत्यू झालाय तर 20 जण जखमी झाले आहेत.
18/07/2024 Image credit: ANI
मदत व बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय - जिल्हाधिकारी डॉ. नेहा शर्मा
18/07/2024 Image credit: ANI
घटनास्थळी 40 सदस्यांची मेडिकल टीम व 15 अॅम्ब्युलन्स उपस्थित आहेत.
18/07/2024 Image credit: ANI
खराब हवामानामुळे मदत आणि बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
18/07/2024 Image credit: ANI
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Image credit: PTI 18/07/2024
जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
18/07/2024 Image credit: PTI
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठीही मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली.
18/07/2024 Image credit: PTI
रेल्वे बोर्डकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. कमर्शियल कंट्रोल-9957555984, फरकाटिंग- 9957555966, मरियानी - 6001882410
18/07/2024 Image credit: PTI
सिमलगुरी-8789543798 तिनसुकिया-9957555959 दिब्रुगड-9957555960
18/07/2024 Image credit: PTI आणखी वाचा
दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत लष्कर अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद
marathi.ndtv.com