PM आवास योजनेच्या हप्त्यामुळे संसार उद्ध्वस्त, महिला पतीला सोडून प्रियकरांसह पळाल्या

Edited by Harshada J S  Image credit: Canva
08/07/2024

उत्तर प्रदेशातील महाराजगंज परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. 

08/07/2024 Image credit: Canva सर्व फोटो प्रतिकात्मक 

पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला पतीला सोडून प्रियकरासह पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. 

08/07/2024 Image credit: Canva

महाराजगंजच्या निचलौला ब्लॉकमधील हे प्रकरण आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 108 गावांमध्ये 2350 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. 

08/07/2024 Image credit: Canva

 लाभार्थ्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता 40 हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता.

22/03/2024
Image credit: Canva

घर बांधणीसाठी सरकारी योजनेंतर्गत पहिला हप्ता मिळाल्यानंतर काही जणांचा संसारच उद्ध्वस्त झाल्याचा प्रकार घडला.

08/07/2024 Image credit: Canva

एका लाभार्थी महिलेच्या सासूने सांगितले की, 'सूनबाई पळून गेली. तिच्या नावे खात्यात पैसे जमा झाले होते. मुलगा घरात नाही, त्यामुळे आमच्याकडून वसुली करू नये'. 

08/07/2024 Image credit: Canva

पळून गेलेल्या महिलांच्या पतींनी पोलिसांकडे जाऊन दुसऱ्या हप्त्यावर बंदी आणण्याची मागणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. 

08/07/2024 Image credit: Canva

दुसरा हप्ता पत्नींच्या खात्यावर पाठवू नये, असे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे.

08/07/2024 Image credit: Canva

घर बांधणीसाठी पैसे वापरले नाहीत, अशा लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करून वसुलीही करावी, असे निर्देश महाराजगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

08/07/2024 Image credit: Canva

बांधकाम सुरू झाले नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते तसेच वसुली होण्याचीही भीती या पुरुषांना सतावत आहे.   

08/07/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

राज्यसभेच्या पहिल्या भाषणामध्ये सुधा मूर्तींनी या गोष्टींचा केला उल्लेख

marathi.ndtv.com