आर. अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, चाहते निराश 

Edited by Harshada J S Image credit: PTI

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना मोठा धक्का दिला.

Image credit: PTI

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट मालिकेदरम्यान अश्विनने निवृत्तीची घोषणा केली. 

Image credit: PTI

38 वर्षीय अश्विनने भारतासाठी अनिल कुंबळेनंतर 106 मॅचमध्ये सर्वाधिक 537 टेस्ट विकेट घेतल्या आहेत. 

Image credit: PTI

IPLमध्ये 2025मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी वापसी करणारा अश्विन टी20 लीग खेळणार आहे. 

Image credit: PTI

अश्विन 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013मध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता टीमचाही भाग होता. 

Image credit: R Ashwin Insta

एक क्रिकेटर म्हणून माझ्यात अजूनही खेळ जिवंत आहे, पण तो खेळ टी20 लीगमध्ये दाखवण्याची इच्छा आहे : अश्विन 

Image credit: R Ashwin Insta

मी माझ्या कारकिर्दीचा पुरेपूर आनंद लुटला. रोहितसह अन्य खेळाडूंसोबत माझ्या अनेक आठवणी आहेत : अश्विन 

Image credit: R Ashwin Insta

अश्विनने टीम इंडियासाठी 116 वनडे मॅच खेळून 156 तर 65 टी20 मध्ये 72 विकेट्स घेतल्या. 

Image credit: R Ashwin Insta

अश्विनने 2010मध्ये वनडे आणि 2011मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Image credit: R Ashwin Insta

आणखी वाचा

वर्ल्ड चेस चॅम्पियन डी गुकेशचे चेन्नईमध्ये जंगी स्वागत

marathi.ndtv.com