वायनाडमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत 153 जणांचा मृत्यू, कित्येक लोक बेपत्ता

Edited by Harshada J S Image credit: ANI
31/07/2024

केरळमधील वायनाड येथे भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. 

Image credit: PTI 31/07/2024

दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 153 जणांचा मृत्यू झाला आहे. 

31/07/2024 Image credit: PTI

सरकारी यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे. 

31/07/2024 Image credit: PTI

कित्येक लोक बेपत्ता देखील झाले आहेत. 

31/07/2024 Image credit: PTI

भारतीय लष्कराने वायनाडमध्ये शोध आणि बचाव कार्यासाठी सुमारे 300 जवान तैनात केले आहेत.

31/07/2024 Image credit: PTI

मंगळवारी (30 जुलै) संध्याकाळी उशीरा NDRF व लष्कराच्या मदतीसाठी नौदल दल आणि हवाई दलाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले.

31/07/2024 Image credit: PTI

मुसळधार पावसामुळे केरळमधील कित्येक मार्गाचा संपर्क तुटला आहे. यामुळे बचाव आणि कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. 

31/07/2024 Image credit: PTI

राज्यात 24 तासांमध्ये 372 मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वीच वायनाड जिल्ह्यात चार तासांमध्ये तीन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या.

Image credit: IANS 31/07/2024

येत्या काही दिवसांत वायनाडसह अन्य जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने पावसाचा वर्तवली आहे.

Image credit: ANI 31/07/2024

इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. 

Image credit: ANI 31/07/2024

पथानामथिट्टा, अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Image credit: ANI 31/07/2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांच्याशी संवाद साधून सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Image credit: ANI 31/07/2024

पंतप्रधान कार्यालयाने दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

31/07/2024 Image credit: ANI

वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे, यामुळे कित्येक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

31/07/2024 Image credit: ANI

मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला, नूलपुझा या गावांचा संपर्क तुटल्याने कित्येक लोक अडकले आहेत.

31/07/2024 Image credit: ANI

मुसळधार पावसामुळे येथील नद्यांनाही पूर आला आहे. कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी सरकारने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत.

31/07/2024 Image credit: ANI

आणखी वाचा

अभिमान! 'जया अमिताभ बच्चन' असा उल्लेख होताच त्या संतापल्या, पुढे जे घडलं ते...

marathi.ndtv.com