उद्धव ठाकरेंनी ते संकेत दिले, आगामी निवडणुकांबाबत संजय राऊतांचे मोठे विधान

Edited by Harshada J S Image credit: PTI

शिवसेना (उबाठा) आगामी सर्व मनपा निवडणुका एकट्याने लढवणार, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 

Image credit: PTI

इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे लोकसभा आणि निवडणुकीसाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Image credit: PTI

आघाडीमध्ये सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही आणि संघटनात्मक विकासात अडथळा येतो, असेही राऊत म्हणाले.

Image credit: PTI
आम्ही मुंबई, ठाणे, नागपूर, इतर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढवू: संजय राऊत
Image credit: ANI 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाला स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत, असेही ते म्हणाले. 

Image credit: ANI 

विधानसभा निवडणुकीतील मविआच्या पराभवाबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपप्रत्यारोपांसंदर्भातही राऊतांनी निशाणा साधला.

Image credit: ANI 

राऊत म्हणाले की, जे लोक सहमती, तडजोडींवर विश्वास ठेवत नाहीत; त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नाही.

Image credit: ANI 

इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीनंतर एकही बैठक घेतली नाही, असाही दावा राऊतांनी केलाय.

Image credit: ANI 

इंडिया आघाडीसाठी आम्हाला एक समन्वयकही नियुक्त करता आला नाही, हे योग्य नाही:संजय राऊत

Image credit: ANI

आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून बैठक बोलावण्याची जबाबदारी काँग्रेसची असल्याचंही राऊत म्हणाले.

Image credit: ANI

आणखी वाचा

Fastag Rule: चारचाकी वाहनांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडला तर...

marathi.ndtv.com