वेटलॉससाठी 'या' लाल रंगाच्या डाळीच्या 5 पौष्टिक रेसिपी

Edited by Harshada J S Image credit: Vaani Kapoor

प्रोटीनचे उत्तम स्त्रोत म्हणजे मसूर डाळ. या डाळीतील पोषणतत्त्व वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. 

Image credit: Canva

मसूरच्या डाळीमध्ये फायबर, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्म आहेत. या पोषकतत्त्वांमुळे शरीराचे अतिरिक्त वजन घटण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

वजन घटवण्यासाठी मसूर डाळीपासून तयार करण्यात येणाऱ्या पाच पौष्टिक रेसिपी जाणून घेऊया.

Image credit: Canva

वजन कमी करायचे असेल तर मूसर डाळीचे सूप तयार करा. मसूर डाळीचे सूप प्यायल्यास शरीरास पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. 

Image credit: Canva

मसूर डाळीचा डोसा देखील खाऊ शकता. डोशाचे बॅटर डाळीपासूनच तयार करावे. या रेसिपीमुळे शरीराला प्रोटीनचा पुरवठा होईल. 

Image credit: Canva

दुपारच्या अथवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही मसूर डाळीचा समावेश करू शकता. डाळ तयार करताना तूप, टोमॅटो आणि हिरव्या मसाल्यांचा वापर करावा. 

Image credit: Canva

मसूर डाळ, कांदे, ओले खोबरे, हिरव्या मिरच्यांचा वापर करून मसूर डाळ करीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. 

Image credit: Canva

वेटलॉससाठी मसूर डाळीची खिचडी सर्वात उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ पचण्यासही हलका आहे. शिवाय शरीरास मोठ्या प्रमाणात प्रोटीनचाही पुरवठा होईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

हे उपाय केले तर चेहऱ्यावरील फॅट्स होतील झटकन कमी, दिसाल आकर्षक

marathi.ndtv.com