ग्रीन टीमध्ये 'हा' रस मिक्स करून प्यायल्यास वजन होईल झटकन कमी

Edited by Harshada J S Image credit: Canva

ग्रीन टी हे एक सर्वोत्तम पेय मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्यायल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतात. 

Image credit: Canva

ग्रीन टीमध्ये लिंबू मिक्स करून प्यायल्यास शरीराचे वजन घटण्यासह अन्य कित्येक लाभ मिळू शकते. 

Image credit: Canva

ग्रीन टी आणि लिंबूमुळे चयापचयाची क्षमता सुधारते, ज्यामुळे कॅलरीज् बर्न होतात आणि वजनही जलदगतीने घटते. 

Image credit: Canva

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अ‍ॅसिड असते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

ग्रीन टी आणि लिंबू एकत्रित करून प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. कारण लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. 

Image credit: Canva

ग्रीन टी आणि लिंबूतील पोषणतत्त्व त्वचेसाठी लाभदायक आहे. मुरुम, पुरळ यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

ग्रीन टीमध्ये फ्लेव्हेनॉइड्स असतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. ग्रीन टीमध्ये लिंबूचे काही थेंब मिक्स केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

रात्री लवकर जेवल्यास आरोग्यावर होतात इतके परिणाम?

marathi.ndtv.com