रिकाम्या पोटी प्या 'या' पानांचे पाणी, पोट स्वच्छ होण्यास मिळतील अद्भुत फायदे 

Image credit: Canva

सकाळी पोट स्वच्छ होत नसल्याच्या कारणामुळे अनेकजण त्रस्त असतात. कित्येक उपाय केल्यानंतरही या समस्येपासून सुटका मिळत नाहीय. 

Image credit: Canva

पण सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही औषधी पानांचे पाणी प्यायलात तर पोट स्वच्छ होण्यासह अगणित लाभ मिळतील. 

Image credit: Canva

मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांचे पाणी रिकाम्या पोटी पिणे आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते.

Image credit: Canva

मोरिंगामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ईसह कॅल्शिअम, पोटॅशिअम व प्रोटीन यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी मोरिंगाचे पाणी प्यायल्यास पचनप्रक्रिया सुधारू शकते. बद्धकोष्ठता, गॅस यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत. 

Image credit: Canva

मोरिंगातील पोषणतत्त्व आणि अँटी-ऑक्सिडेंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Image credit: Canva

नियमित मोरिंगाचे पाणी प्यायल्यास शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मोरिंगामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मोरिंगातील पोषण तत्त्वांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

वजन कधीच वाढणार नाही, जेवणानंतर केवळ 10 मिनिटांसाठी करा हे काम

marathi.ndtv.com