Weight Loss Tips: मखाणे खाल्ल्यास खरंच वजन घटते का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

मखाणे हे फॉक्स नट्स किंवा लोटस सीड्स या नावानेही ओळखले जातात. मखाणे खाल्ल्यास वजन कमी करण्यासह कित्येक लाभ मिळतात. 

Image credit: Canva

मखाण्यामध्ये कॅलरीज् कमी असतात आणि फायबर जास्त असते. ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही आणि वजनही कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे गुणधर्म आहेत, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. 

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी कमी होण्यास आणि मधुमेहाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये कॅल्शिअम अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. 

Image credit: Canva

मखाण्यांमधील अमिनो अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन बी6मुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते. ज्यामुळे झोपही चांगली येते. 

Image credit: Canva

मखाण्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि बद्धकोष्ठता, गॅस यासारख्या समस्यांपासून सुटका होते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

दररोज दोरीच्या उड्या मारण्याचे अद्भुत फायदे

marathi.ndtv.com