अतिरिक्त फॅट्स झटपट बर्न करायचे आहेत? या आहेत सोप्या टिप्स

Edited by Harshada J S Image credit: Canva

धकाधकीच्या जीवनामुळे आणि जंक फुडच्या सेवनामुळे बहुतांश लोक वजनवाढीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. 

Image credit: Canva

काही लोक जीममध्ये जाऊन वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. तर काही लोक डाएट फॉलो करुन वजन घटवतात.

Image credit: Canva

काही साध्या सोप्या टिप्स फॉलो करुन वजन सहजरित्या कमी केले जाऊ शकते. 

Image credit: Canva

जास्तीत जास्त पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहते आणि भूकही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळेही वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

डाएटमध्ये मीठ आणि साखरेचा कमी प्रमाणात समावेश करावा. यामुळे वजनही घटेल शिवाय मधुमेह व हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होईल. 

Image credit: Canva

काही लोकांना जलदगतीने खाण्याची सवय असते. यामुळे पचनप्रक्रिया बिघडण्यासह वजनही वाढते. 

Image credit: Canva

डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. 

Image credit: Canva

नियमित 7-8 तास झोपावे. यामुळेही तणाव कमी होण्यासह वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

एक चमचा मेथीचे दाणे भिजवून खा, दूर होतील या 4 समस्या

marathi.ndtv.com