पेटीकोट कॅन्सर म्हणजे नेमके काय? महिलांनो ही चूक करणे टाळा
Edited by Harshada J S
Image credit: Canva
सोशल मीडियावर सध्या पेटीकोट कॅन्सरची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नेमके हा काय प्रकार आहे? जाणून घेऊया सविस्तर...
Image credit: Canva
तुमच्या घरातील महिला कायम साडी नेसतात? वर्षानुवर्षे साडीच नेसत आहेत का? तर मग ही माहिती नक्की वाचा.
Image credit: Canva
कारण या कॅन्सरचा संबंध साडीच्या आतमध्ये घालाव्या लागणाऱ्या पेटीकोटशी म्हणजे परकरशी आहे.
Image credit: Canva
काही महिला आजही दिवसभर साडी नेसतात. यापैकी काहींना परकरचा नाडा अतिशय घट्ट बांधण्याची सवय असते. यामुळे नाड्याचे निशाण कमरेवर दिसू लागतात.
Image credit: Canva
दोन भारतीय महिलांमध्ये पेटीकोट कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या केस स्टडीद्वारे समोर आलीय.
Image credit: Canva
परकरचा नाडा अतिशय घट्ट बांधणाऱ्या महिलांना पेटीकोट कॅन्सरचा धोका अधिक असू शकतो, असे या केस स्टडीमध्ये आढळून आले.
Image credit: Canva
परकरच्या नाड्याचा त्वचेवर दबाव येऊन जळजळ होणे, त्यानंतर अल्सरची समस्या निर्माण होणे.
Image credit: Canva
काही महिलांच्या कमरेवर फोड येतात तर काही प्रकरणांत त्वचेचा कॅन्सरही होण्याचा धोका असतो.
Image credit: Canva
कमरेवर काळे डाग, नाड्यामुळे त्वचेवर सूज येणे ही पेटीकोट कॅन्सरची लक्षणे आहेत.
Image credit: Canva
पेटीकोट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी परकरचा नाडा घट्ट बांधू नये. परकरचे कापड मऊ असावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
मधुमेहग्रस्त गूळ खाऊ शकतात का?
marathi.ndtv.com