अंतरिम व पूर्ण अर्थसंकल्पामध्ये नेमका फरक काय?

Edited by Harshada J S Image credit: Canva

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करतील. 

Image credit: PTI

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. अंतरिम व पूर्ण अर्थसंकल्पात नेमका काय फरक असतो, ते जाणून घेऊया...

Image credit: Canva

दरवर्षी 1 फेब्रुवारीला लोकसभेत पूर्ण बजेट सादर केले जाते. पण सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी जे बजेट सादर केले जाते, त्यास अंतरिम बजेट म्हणतात. 

Image credit: Canva

पूर्ण बजेटवर लोकसभेत सविस्तर चर्चा केली जाते व ते पारित केले जाते. अंतरिम बजेट कोणत्याही चर्चेविना पारित केले जाते. 

Image credit: Canva

पूर्ण बजेटमध्ये योजना व धोरणांच्या घोषणा केल्या जातात. अंतरिम बजेटमध्ये नव्या योजना-धोरणांच्या घोषणा केल्या जात नाहीत. 

Image credit: Canva

पूर्ण बजेटमध्ये संपूर्ण वर्षाकरिता निधी वाटप केला जातो. अंतरिम बजेटमध्ये सार्वत्रिक निवडणुकीपर्यंतचा खर्च पूर्ण करण्यासाठी निधी दिला जातो.

Image credit: Canva

पूर्ण अर्थसंकल्पात सरकारच्या उत्पन्नाच्या सर्व स्रोतांचे तपशीलवार वर्णन असते, तर अंतरिम अर्थसंकल्पामध्ये तसे नसते. 

Image credit: Canva

पूर्ण अर्थसंकल्प सरकारचे धोरणात्मक प्राधान्यक्रम व आर्थिक दृष्टीकोन दर्शवतो तर अंतरिम बजेटमध्ये निवडणुकीपर्यंत सरकारचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी निधीची तरतूद केली जाते.

Image credit: Canva

आणखी वाचा

बजेटचे आतापर्यंतचे सर्वात मोठे व छोटे भाषण कोणी दिले?

marathi.ndtv.com