Tbsp आणि Tsp मध्ये काय आहे फरक?

Edited by Harshada J S Image credit: Canva

इंस्टाग्राम रील्स असो किंवा यू-ट्युब शॉर्ट्स सर्वत्र खाद्यपदार्थांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात.

Image credit: Canva

व्हिडीओद्वारे एकापेक्षा एक स्वादिष्ट आणि आगळ्यावेगळ्या पदार्थांच्या रेसिपी पाहायला मिळतात.

Image credit: Canva

पण जेव्हा याच रेसिपी आपण घरामध्ये ट्राय करून पाहतो, त्यावेळेस गोंधळ होता. कारण कोणती सामग्री किती प्रमाणात वापरावी? याचे गणित चुकते. 

Image credit: Canva

कारण व्हिडीओमध्ये Tbsp आणि Tsp चे प्रमाण सांगितले जाते. पण यामध्ये नेमका काय फरक असतो? हे अनेकांना माहीत नसते.

Image credit: Canva

Tbsp म्हणजे टेबलस्पून, हे प्रमाण Tsp हून जास्त असते. उदा- 3 tsp चे प्रमाण 1Tbsp समान असते. 

Image credit: Canva

mlमध्ये हे प्रमाण सांगायचे झाले तर 1 टेबलस्पून म्हणजे जवळपास 15 मिलीलीटर प्रमाण होते आणि 1 टीस्पून म्हणजे केवळ 5 मिलीलीटर अर्थात एक छोटा चमचा. 

Image credit: Canva

द्रवयुक्त पदार्थांसाठी साधारणतः टेबलस्पूनचा वापर केला जातो. तर मीठ, मसाला यासारख्या कोरड्या पदार्थांसाठी टीस्पूनचा वापर केला जातो. 

Image credit: Canva

याव्यतिरिक्त Tbsp हे अनेकदा 'T' आणि tsp हे 't' असे नमूद केले जाते. टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा आणि टीस्पूनचा छोटा चमचा म्हणून उल्लेख केला जातो. 

Image credit: Canva

आणखी वाचा

केसांच्या वाढीसाठी ही हिरवी गोष्ट आहे फायदेशीर

marathi.ndtv.com