झीरो प्रीस्क्रिप्शन धोरण आहे तरी काय?

Edited by Harshada J S Image credit: Canva

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात उपचार केले जातात.

Image credit: Canva

गोरगरिबांना मोफत उपचार मिळावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Image credit: Canva

याच प्रयत्नांचा भाग म्हणून झीरो प्रीस्क्रिप्शन धोरण राबवण्यात येणार आहे.

Image credit: Canva

झीरो प्रीस्क्रिप्शन धोरणाचा लाखो रुग्णांना लाभ मिळणार आहे.

Image credit: Canva

मुंबई महापालिकेची सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांद्वारे वर्षाला अंदाजे 50 लाख रुग्णांना आरोग्यसेवा मिळते.

Image credit: Canva

महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत काही रुग्णांना बाहेरील औषधे सुचवली जातात. 

Image credit: Canva

या औषधांसाठी डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन लागते, औषधे महाग असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना अनेकदा ती परवडत नाहीत.

Image credit: Canva

यापुढे रुग्णांना लागणारी औषधे निशुल्क देण्याचा महापालिका प्रयत्न करणार आहे.

Image credit: Canva

बाहेरुन औषधे आणावी लागणार नाही. त्यामुळे प्रीस्क्रिप्शनही लागणार नाही, यामुळे यास झीरो प्रिस्क्रिप्शन धोरण म्हणतात.

Image credit: Canva

गोळ्या, सीरप, इंजेक्शन, बँडेज् यासह एकही औषध रुग्णांना बाहेरुन आणावे लागू नये, यासाठी प्रयत्न केला जातोय.

Image credit: Canva

ही प्रक्रिया खूप मोठी असून ती किचकटही आहे. त्यामुळे हे धोरण लागू होण्यास विलंब लागत असल्याचे बोलले जातंय.

Image credit: Canva

आणखी वाचा

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात Photos

marathi.ndtv.com