उष्माघात झाल्यास काय काळजी घ्याल?

Image credit: Canva
16/04/2024

बाहेरील तापमानं वाढलं की, शरीरातील थर्मोरेग्युलेशन बिघडतं आणि शरीरातील क्षार, पाण्याचं प्रमाण कमी होणं याला उष्णाघात म्हणतात.

Image credit: Canva
16/04/2024

2023 या वर्षी 22 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता.

Image credit: Canva
16/04/2024

उष्णतेची लाट पाहता गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं. 

Image credit: Canva
16/04/2024

घराबाहेर पडताना टोपी किंवा ओढणीने डोकं झाकून घ्यावं. डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी सनग्लासेस घालणं उपयुक्त. 

Image credit: Canva
16/04/2024

घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली ठेवावी. आहारात फळं, सरबतं, पाण्याचा समावेश वाढवावा. 

Image credit: Canva
16/04/2024

चक्कर, उलट्या, मळमळ, पोटात कळ येणं, शरीरातील पाणी कमी होणं ही उष्माघाताची लक्षणं आहेत. 

Image credit: Canva
16/04/2024


यापैकी काही लक्षणं आढळल्यास डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. 

Image credit: Canva
16/04/2024

दर तीन ते चार तासांनी लघवीला जाणं आवश्यक आहे, यासाठी तेवढं पाणी शरीरात जायला हवं.

Image credit: Canva
16/04/2024

उन्हाचा तडाखा जास्त असेल तर मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स पिणं कमी करा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सिगारेट सोडणं खरचं कठीण असतं का?

marathi.ndtv.com