बारामतीत अजित पवारांसमोर आव्हान उभं करणारा नवा पवार कोण आहे?

Edited by Harshada J S Image credit: Yugendra Pawar X
Image credit: Sharad Pawar X

शरद पवार यांनी लोकसभेची बारामतीतील लढाई जिंकल्यानंतर आता ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. 

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी मास्टर प्लान तयार केला आहे. 

Image credit: Sharad Pawar X
Image credit: Ajit Pawar X

मास्टर प्लाननुसार ते अजित पवारांसमोर नवा पवार उभा करणार आहेत. 

Image credit: Yugendra Pawar X

हे नवे पवार म्हणजे युगेंद्र पवार आणि आता याच नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बारामतीत युगेंद्र पवार यांच्याकरिता 'भावी नाही तर फिक्स आमदार' अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली. 

Image credit: Yugendra Pawar X

युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या छोट्या भावाचा मुलगा आहे आणि याच युगेंद्र पवारांकडून काकांना आव्हान मिळू शकते, असे म्हटले जातेय.

Image credit: Yugendra Pawar X

युगेंद्र हे श्रीनिवास पवार यांचा मुलगा आहे, जे एक उद्योगपती आहे. 

Image credit: Yugendra Pawar X
Image credit: Ajit Pawar X

अजित पवारांनी काका शरद पवारांना धक्का देत त्यांचा पक्ष, चिन्ह मिळवलं आणि आता अजित पवारांना त्यांचा सख्खा लहान भाऊ श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्रकडून आव्हान मिळू शकते. 

आणखी वाचा

आगरतळामध्ये पावसाचा हाहाकार, ठिकठिकाणी साचले पाणी

marathi.ndtv.com