प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू पायलट बाबांचे निधन, एकेकाळी भारतीय हवाई दलात होते विंग कमांडर

Edited by Harshada J S Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram
21/08/2024
Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram

 महामंडलेश्वर पायलट बाबांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले आहे. 

21/08/2024
Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram

हे पहिले असे आध्यात्मिक गुरू आहेत, जे खूप शिकलेले होते. 

21/08/2024
Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram

एकेकाळी ते भारतीय हवाई दलात विंग कमांडर पदावर कार्यरत होते. म्हणून त्यांना पायलट बाबा असे म्हटले जात होते.

21/08/2024
Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram

इतकेच नव्हे तर 1962चे भारत-चीन युद्ध आणि 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता. 

21/08/2024
Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram

वयाच्या 33व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला. देशपरदेशात त्यांनी कित्येक आश्रम-आध्यात्मिक केंद्र स्थापित केले. 

21/08/2024
Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram

आध्यात्मिक मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा त्यांना त्यांचे गुरू हरिबाबांकडून मिळाली.

21/08/2024
Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram

पायलट बाबांनी सांगितले होते की, 1962साली मिग फायटर विमान उडवताना दुर्घटनेचा सामना करावा लागला, त्यावेळेस कॉकपिटमध्ये हरिबाबांचे दर्शन झाले.

21/08/2024
Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram

बाबांचे दर्शन झाल्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग केले, असे त्यांनीच सांगितले आणि निवृत्त होऊन आध्यात्माचा मार्ग स्वीकारला.

21/08/2024
Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram

पायलट बाबांनी Unveils Mystery Of Himalaya (Part 1) आणि Discover Secret Of The Himalaya (Part 2) अशी दोन पुस्तकंही लिहिली आहेत.

21/08/2024
Image credit: Mahayogi Pilot Baba Instagram

पायलट बाबांचा जन्म बिहारमधील सासाराम येथे झाला होता. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतून त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री विषयामध्ये मास्टर पदवी संपादित केलीय.

21/08/2024

आणखी वाचा

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: जवळपास 300 आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, 40 जण अटकेत

marathi.ndtv.com