तुम्ही देखील हा पांढरा ज्युस पिताय? होऊ शकते मोठे नुकसान

Edited by Harshada J S Image credit: Canva

लिंबाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण काही लोकांनी कटाक्षाने लिंबाचे सेवन करणे टाळले पाहिजे,अन्यथा नुकसान होऊ शकते. 

Image credit: Canva

लिंबू खाल्ल्यास कोणाकोणाला त्रास होऊ शकतो? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

अ‍ॅसिडिटी किंवा गॅस्ट्रिकची समस्या असणाऱ्यांनी लिंबाचा रस पिऊ नये. कारण लिंबूमध्ये निसर्गतः अ‍ॅसिड असते, ज्यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते. 

Image credit: Canva

यामुळे गॅस्ट्रिक अल्सर, अ‍ॅसिड रिप्लॅक्स आणि हृदयामध्ये जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Image credit: Canva

दात संवेदनशील असतील, तर लिंबाचे सेवन करणं टाळले पाहिजे. लिंबाच्या रसामुळे दातांच्या इनॅमलचे नुकसान  होऊ शकते. 

Image credit: Canva

सायट्रिक अ‍ॅसिडयुक्त फळांची अ‍ॅलर्जी असल्यास लिंबाचा रस पिणे टाळावे. यामुळे त्वचेवर रॅशेज् येणे आणि त्वचेला खाज येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

पोटामध्ये अल्सर असल्यास लिंबू पाणी पिणे टाळावे. कारण यातील अ‍ॅसिडिक गुणधर्मामुळे अ‍ल्सरची समस्या अधिक वाढू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

ग्रीन टीमध्ये 'हा' रस मिक्स करून प्यायल्यास वजन होईल झटकन कमी

marathi.ndtv.com