तुळस-आल्यासह 'या' मसाल्यांचा चहा आरोग्यासाठी ठरेल अमृतासमान
Edited by Harshada J S Image credit: Canva
नेहमीचा चहा करून पिण्यापेक्षा काही गरम मसाल्यांचा वापर करून चहा तयार केल्यास आरोग्यास कित्येक फायदे मिळतील.
Image credit: Canva
चहामध्ये लवंग, तेजपत्ता, तुळशीची पाने, ओवा, काळीमिरी आणि आल्याचा समावेश करणे फायद्याचे असते.
Image credit: Canva
आयुर्वेदानुसार या मसाल्यांचा वापर करून तयार केलेला चहा हिवाळ्यात पिणे आरोग्यासाठी पोषक मानले जाते.
Image credit: Canva
शरीराला ऊर्जा मिळण्यासह छोट्या-मोठ्या आजारांपासूनही सुटका मिळते.
Image credit: Canva
उकळत्या पाण्यात चहा पावडर, साखरसह आले, काळीमिरी, ओवा, तेजपत्ता, लवंगही मिक्स करा.
Image credit: Canva
तुमच्या आवश्यकतेनुसार चहाच्या सामग्रीचे प्रमाण ठरवावे.
Image credit: Canva
तेजपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, लोह, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असते; ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Image credit: Canva
काळ्यामिरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळते.
Image credit: Canva
आल्यामध्ये जिंजरोल नावाचे तत्त्व आहे, ज्यामुळे शरीराला ऊब मिळते.
Image credit: Canva
ओव्यातील पोषक घटकांमुळे संसर्गजन्य आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
लाल, पिवळ्या, काळ्या रंगाच्या बिया खाल्ल्यास केसांची होईल भराभर वाढ
marathi.ndtv.com