अ‍ॅनाकोंडाबाबतच्या या गोष्टी माहितीयेत का?

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

वजन आणि लांबीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा साप म्हणून अ‍ॅनाकोंडा ओळखला जातो. याचे वजन जवळपास 230 किलोग्रॅम एवढं असते. 

Image credit: Canva

ग्रीन अ‍ॅनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा अ‍ॅनाकोंडा असल्याचे म्हटले जाते.

Image credit: Canva

हिरव्या रंगाच्या या अ‍ॅनकोंडाची लांबी 20 ते 30 फुटांपर्यंत असते. 

Image credit: Canva

महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारचे अ‍ॅनाकोंडा विषारी नसतात. 

Image credit: Canva

ग्रीन अ‍ॅनाकोंडा अमेझॉन रेनफॉरेस्टच्या दलदलीच्या भागासह धिमा प्रवाह असणाऱ्या नद्यांमध्ये आढळतात.

Image credit: Canva

ग्रीन अ‍ॅनाकोंडा त्यांच्या शिकाराला विळखा घालून त्यांचा श्वास गुदमरुन मारतात आणि त्यांना पूर्णपणे गिळतात. 

Image credit: Canva

मादी अ‍ॅनाकोंडा एका वेळेस 20 ते 40 पिल्लांना जन्म देऊ शकते. 

Image credit: Canva

मादी अ‍ॅनाकोंडा नर अ‍ॅनाकोंडापेक्षा आणखी विशाल असते आणि कधीकधी प्रजननानंतर भूकेपोटी नर अ‍ॅनाकोंडाचीही ती शिकार करते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

अ‍ॅनाकोंडा पाण्यामध्ये लपण्यात पटाईत असतात. अ‍ॅनाकोंडा पाण्यात असल्याची भणक त्यांच्या शिकारालाही लागत नाही. 

आणखी वाचा

 हाडे मजबूत कशी ठेवावी? केवळ 20 मिनिटे करा हे काम

marathi.ndtv.com