'काँग्रेस सोड अन्यथा...', बजरंग पुनिया यांना परदेशी नंबरवरून जीवे ठार मारण्याची धमकी

Edited by Harshada J S Image credit: ANI
Image credit: IANS

काँग्रेसचे नेते बजरंग पुनिया यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Image credit: ANI

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी कोणी दिली? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. 

धमकी मिळाल्यानंतर बजरंग पुनिया यांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिक तीव्र करण्यात आलाय. 

Image credit: ANI

पोलिसांच्या माहितीनुसार, बजरंग पुनिया यांना परदेशी क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला होता, ज्यामध्ये त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

Image credit: ANI Image credit: ANI
Image credit: ANI

'बजरंग काँग्रेस सोड, अन्यथा तुझे व तुझ्या कुटुंबाचे भले होणार नाही. हा आमचा शेवटचा इशारा आहे. निवडणुकीपूर्वी दाखवून देऊ आम्ही काय आहोत ते', अशी धमकी देण्यात आली. 

कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी (6 सप्टेंबर 2024) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

Image credit: ANI

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी विनेश फोगट तसेच बजरंग पुनिया यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. 

Image credit: ANI

आणखी वाचा

'विराट कोहलीच्या आक्रमकतेने मला प्रभावित केलंय'

marathi.ndtv.com