दह्यामुळे या गंभीर कॅन्सरचा धोका होईल कमी? संशोधनातील महत्त्वपूर्ण माहिती 

Edited by Harshada J S Image credit: Canva

प्रत्येकाच्या घरामध्ये दही असतेच असते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन आणि पोषक बॅक्टेरियांचा समावेश असतो. 

Image credit: Canva

नव्या संशोधनानुसार नियमित दही खाणाऱ्यांना आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो. 

Image credit: Canva

मास जनरल ब्रिघम येथील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केले आहे. 

Image credit: Canva

संशोधनातील माहितीनुसार, आठवड्यातून किमान दोनदा दही खाणाऱ्यांना आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता 20% कमी असते. 

Image credit: Canva

WHOच्या मते, 10 पैकी 1 कॅन्सर रुग्णामध्ये हा आजार आढळतो. 

Image credit: Canva

शरीरासाठी आवश्यक असणारे चांगले बॅक्टेरिया दह्यामध्ये असतात. 

Image credit: Canva

दरम्यान दह्यामुळे कर्करोगाचा धोका कसा कमी होतो, यामागील नेमके कारण शास्त्रज्ञांना माहीत नाही. 

Image credit: Canva

पण दह्यातील पोषक घटकामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

संशोधनामध्ये 1 लाखाहून अधिक महिला आणि 51 हजार पुरुषांच्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच आरोग्यावर अभ्यास करण्यात आला.

Image credit: Canva

यापैकी 3,079 लोकांना कोलोरेक्टल कॅन्सर झाल्याचे आढळले. 

Image credit: Canva

तसेच दही खाणाऱ्यांना आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता 20% कमी असल्याचे आढळले. 

Image credit: Canva

 नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या दह्याचेच सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

चहा-पिठाच्या गाळणीवरील डाग स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धत

marathi.ndtv.com