शून्य बटण दाबताच लाखो रुपये गायब,प्रसिद्ध YouTuberही झाला डिजिटल अरेस्ट 

Edited by Harshada J S Image credit: Ankush Bahuguna Insta 
Image credit: Ankush Bahuguna Insta

प्रसिद्ध यू-ट्युबर अंकुश बहुगुणाला घोटाळेबाजांनी 40 तासांकरिता डिजिटल अरेस्ट करून ठेवले होते. 

Image credit: Ankush Bahuguna Insta

शून्य बटण दाबल्यानंतर अकाउंटमधील लाखो रुपये कसे उडाले? याचा अनुभव अंकुशने व्हिडीओद्वारे सांगितला.

Image credit: Ankush Bahuguna Insta

अंकुशला आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आला आणि त्याच्या पार्सलची डिलिव्हरी कॅन्सल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

Image credit: Ankush Bahuguna Insta

शून्य क्रमांक दाबून पार्सलशी संबंधित माहिती कस्टमर केअरकडून जाणून घेऊ शकता, असा सल्ला त्याला देण्यात आला. 

Image credit: Ankush Bahuguna Insta

अंकुशने त्यांचे ऐकून शून्य क्रमांक दाबला, हीच त्याची चूक झाली. 

Image credit: Ankush Bahuguna Insta

अंकुशला सांगण्यात आले की, त्याचे पार्सल चीनकडे जात आहे, ज्यामध्ये आधारकार्डचाही समावेश आहे. 

Image credit: Ankush Bahuguna Insta

'पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू आहेत. तुमचे ड्रग्स तस्कर प्रकरणाशी संबंध आहेत', असेही आरोप त्याच्यावर करण्यात आले. 

Image credit: Ankush Bahuguna Insta

 यानंतर त्याचा संवाद व्हॉट्स अ‍ॅपवर ट्रान्सफर करण्यात आला, व्हिडीओ कॉलमध्ये अंकुशला कस्टम ऑफिसरच्या पेहरावामध्ये एक व्यक्ती दिसला.

Image credit: Ankush Bahuguna Insta

कस्टम ऑफिसरने व्हिडीओ कॉलवरच अंकुशला अटक करण्याची धमकी दिली. तसेच त्याची खासगी माहितीही घेतली. 

Image credit: Ankush Bahuguna Insta

चलाखीने त्याने अंकुशच्या अकाउंटमधील मोठी रक्कमही काढली. यादरम्यान त्याला घाबरवण्यात-धमकावण्यातही आले. 

Image credit: Ankush Bahuguna Insta

तब्बल 40 तासांकरिता डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते, असे खुद्द अंकुशने सांगितले. 

आणखी वाचा

जान्हवी किल्लेकरची 'या' मालिकेत होणार धमाकेदार एण्ट्री

marathi.ndtv.com