Orleans Attack: नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मृत्यूचे तांडव! गर्दीत ट्रक घुसवून अंदाधुंद गोळीबार; 15 जण ठार

नववर्षाचे सेलिब्रेशन करत असलेल्या गर्दीत भरधाव ट्रक घुसवत त्यानंतर केलेल्या अंधाधुंद गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यू ऑर्लिन्स शहरात ही भयंकर घटना घडली

जाहिरात
Read Time: 2 mins

America Firing News: जगभरात नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत अन् सेलिब्रेशन केले जात आहे. अशातच अमेरिकेमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नववर्षाचे सेलिब्रेशन करत असलेल्या गर्दीत भरधाव ट्रक घुसवत त्यानंतर केलेल्या अंधाधुंद गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यू ऑर्लिन्स शहरात ही भयंकर घटना घडली असून हल्लेखोराला ठार करण्यात आलं आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नववर्षाचे सेलिब्रेशन करत असलेल्या गर्दीत एक भरधाव ट्रक घुसला त्यानंतर चालकाने बेछुट गोळीबार केला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झालेत. ही घटना पहाटे 3.15 च्या सुमारास बोरबॉन स्ट्रीट आणि इबरव्हिलजवळ घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमधून खाली उतरताच चालकाने जमावावर गोळीबार सुरू केला. घटनास्थळावरून प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावर दिसत आहेत आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. जखमी लोक रस्त्यावर दिसतात. यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, न्यू ऑर्लिन्स पोलिसांनीही संशयितावर गोळीबार केला. घटनेनंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

Shocking News: नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण, निष्पापांचा घात; 5 जणांच्या मृत्यूने गाव हादरलं

अपघात आणि गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून घटनास्थळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये स्थानिक अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि संशयिताला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Advertisement

दरम्यान, एफबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे एफबीआयचे मत आहे. तपासादरम्यान एफबीआयला ज्या ट्रकमधून हा हल्ला करण्यात आला त्या ट्रकमधून ISIS शी संबंधित अनेक पुरावे सापडले. ज्या ट्रकमधून हा हल्ला करण्यात आला होता, त्या ट्रकमधून एफबीआयला आयएसआयएसचा झेंडाही सापडला आहे.