Big news: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मागितली माफी, 'त्या' घटनेला जबाबदार कोण?

अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांना संपर्क केला होता. त्यांच्या बरोबर बोलताना पुतिन यांनी त्यांची माफी मागितली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी माफी मागितली आहे. त्यांनी शनिवारी अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांना संपर्क केला होता. त्यांच्या बरोबर बोलताना पुतिन यांनी त्यांची माफी मागितली आहे. ख्रिसमच्या दिवशी अजरबैजान एअर लाईन्सचं एक विमान कझाकीस्तानमध्ये कोसळलं होतं. त्यात जवळपास 38 जणांचा मृत्यू झाला होता. रशियाच्या हवाई क्षेत्रात ही दुर्घटना झाली. त्याबद्दल पुतिन यांनी माफी मागितली आहे. शिवाय ज्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्या त्यांच्याबद्दल दुख व्यक्त केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजरबैजान एअरलाईन्सचे विमान वारंवार ग्रोज़्नी विमानतळावर उतरण्याची परवानगी मागत होते. त्याच वेळी ग्रोज़्नी, मोजदोक आणि व्लादिकावकाज या ठिकाणी युक्रेन मार्फत ड्रोन हल्ले केले जात होते. हे हल्ले रशियाच्या वायु सेनेनं परतवून लावले होते. रशियाच्या हवाई क्षेत्रात असताना विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे विमानावरचं नियंत्रण पुर्ण पणे संपले होते. अजरबैजानच्या राष्ट्रपती कार्यालयानेही याबाबत एक प्रसिद्धपत्रक काढलं आहे त्यात हा खुलासा करण्यात आलाय. 

ट्रेंडिंग बातमी - Prajakta Mali : 'परळीत पुरुष कलाकार जात नाहीत का?' सुरेश धस यांच्या आरोपांना अभिनेत्रीचं चोख उत्तर

त्यात त्यांनी सांगितले की विमानवर अनेक ठिकाणी छिद्र पडली होती. ज्यावेळी विमानावर हल्ला झाला त्यात अनेक विमान प्रवाशी जखमी झाले. या अपघातात जे वाचले त्यांनीही त्यावेळी नक्की काय झालं हे सांगितलं आहे. पुतीन यांनी असंही सांगितलं की विमान ज्या वेळी खाली उतरत होतं त्यावेळी रशियाचं हवाई दल पुर्णपणे तयार होतं. मात्र काही दिवसापूर्वी असं सांगितलं जात होतं की हे विमान रशियाच्या सैन्याने चुकून पाडलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Parbhani Crime: तिसरी ही लेक झाली, नवरा संतापला अन् 30 वर्षीच्या पत्नी बरोबर भयंकर केलं

अजरबैजानने ही आता ही गोष्ट स्पष्ट केली आहे. अजरबैजान एयरलाइन्सचे विमान रशियाच्या हवाई क्षेत्रात गेलं होतं. त्याच वेळी तिथे तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर ते दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेचा आता तपास अजरबैजान सरकार करत आहे. मात्र काही माध्यमांनी हे विमान मिसाईल हल्ल्यात कोसळले असल्याचं म्हटले आहे. त्याचे निशाण त्या विमानाच्या अवशेषावर असल्याचंही म्हटलं आहे. 

Advertisement