Baba Vanga: 2026 मध्ये काय होणार? इराणमधील युद्धामुळे बाबा वेंगांचे भयानक भाकीत चर्चेत; बघा काय आहे पूर्ण सत्य

Baba Vanga 2026 Predictions: हे युद्ध म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना? असा प्रश्न आता प्रत्येक घराघरात चर्चेत आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Baba Vanga 2026 Predictions: बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, या युद्धाचा सर्वात मोठा फटका युरोपला बसणार आहे.
मुंबई:

Baba Vanga 2026 Predictions: आकाशात एकमेकांना धडकणारी क्षेपणास्त्रे, कानाचे पडदे फाडणारे भीषण स्फोट आणि जिकडे तिकडे पसरलेला मृत्यूचा थरार! सध्या मध्यपूर्वेत जे सुरू आहे, ते पाहून अख्खं जग सध्या अस्वस्थ आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. पण सर्वात जास्त धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे, बुल्गेरियाच्या  भविष्यवेत्त्या 'बाबा वेंगा' यांनी 2026 साठी केलेली ती एक जुनी भविष्यवाणी. हे युद्ध म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना? असा प्रश्न आता प्रत्येक घराघरात चर्चेत आहे. 

काय आहे बाबा वेंगांची 2026 बद्दलची भविष्यवाणी?

अनेक वर्षांपूर्वी बाबा वेंगा यांनी वर्तवले होते की, 2026 मध्ये जगात एक महाभयंकर युद्ध सुरू होईल. त्यांनी म्हटले होते की, या युद्धाची ठिणगी 'पूर्वेकडून' पडेल आणि पाहता पाहता हा वणवा संपूर्ण जगाला गिळून टाकेल. 

Advertisement

आज ज्या प्रकारे इराण आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये युद्ध पेटले आहे, ते पाहता बाबा वेंगा यांचे शब्द खरे ठरताना दिसत आहेत. लोकांच्या मनात आता एकच धास्ती आहे की, ही भविष्यवाणी म्हणजे विनाशाची सुरुवात तर नाही ना?

( नक्की वाचा : Mumbai to Dubai :समोरून येत होते क्षेपणास्त्र! मुंबई-दुबई विमानाचा हवेतच थरारक यु-टर्न; पाहा काय घडलं? )

युरोपचा विनाश आणि नव्या सत्तेचा उदय

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, या युद्धाचा सर्वात मोठा फटका युरोपला बसणार आहे. त्यांनी सांगितले होते की, या संघर्षानंतर युरोपची अवस्था अत्यंत दयनीय होईल आणि तिथली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. 

धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व गोंधळात रशिया हा जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून समोर येईल, असेही त्यांनी म्हटले होते. सध्या अमेरिका आणि इराणमधील वाद ज्या पद्धतीने वाढत आहेत, त्यावरून अमेरिका आणि रशिया आमनेसामने येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

( नक्की वाचा : Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल )
 

इस्रायल आणि अमेरिकेचा इराणवर मोठा दावा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उघडपणे सांगितले आहे की, त्यांनी इराणवर हल्ला का केला. त्यांच्या मते, इराण जमिनीखाली अशी गुप्त ठिकाणे आणि बंकर्स बनवत होता, जिथे त्यांचे अणू कार्यक्रम आणि क्षेपणास्त्रे काही महिन्यांतच पूर्णपणे सुरक्षित झाली असती. जर आताच त्यांना रोखले नसते, तर भविष्यात त्यांना थांबवणे कोणालाच शक्य झाले नसते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कारवाईला पाठिंबा देत, इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखणे ही जगाच्या सुरक्षिततेसाठी काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

युद्धाचा वणवा जगभर पसरणार?

इराणनेही या हल्ल्याचा बदला घेण्याचे जाहीर केले असून त्यांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सच्या साहाय्याने अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू केले आहेत. या युद्धात आता कुवेत, कतार, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिराती यांसारखे देशही ओढले जात आहेत. यामुळे केवळ लष्करी नुकसानच नाही, तर सामान्य नागरिकांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. बाबा वेंगा यांनी सांगितल्याप्रमाणे हे युद्ध खरोखरच तिसऱ्या महायुद्धाचे रूप घेणार का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Topics mentioned in this article