Balochistan news : भारताकडून मिळालेल्या सडेतोड प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. बलुचिस्तानातील एक बड्या नेत्याने बुधवारी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची (balochistan declared independence) अधिकृत घोषणा केली आहे. या बड्या नेत्याचं नाव मीर यार बलोच आहे. गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, माणसांना गायब करणं आणि मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचे हा निर्णय घेण्यात आल्याचं मीर यार यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मीर यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा एक्सवर ट्वीट करून दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी पुढे लिहिलंय, बलुचिस्तानमधील नागरिकांनी आपला निर्णय घेतला आहे. जगाने आता शांत बसू नये. यानंतर मीर यार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन समर्थन मिळावं अशी विनंती केली आहे.
नक्की वाचा - Indus Water Treaty : पाकिस्तानची पाण्यासाठी तडफड, पत्र लिहून केली विनंती, भारताची भूमिका काय?
या पोस्टमध्ये मीर यार लिहितात, तुम्ही आम्हाला मारू शकता पण आम्ही यातून बाहेर पडू. आम्ही वंश वाचवण्यासाठी बाहेर पडलो आहोत. आमच्यात सामील व्हा. ते म्हणाले की, पाकव्याप्त बलुचिस्तानमध्ये बलुच लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही हा त्यांचा निर्णय आहे.
मीर यार यांनी पीओकेबद्दल भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. पाकिस्तानने हा परिसर रिकामी करावा यासाठी आतंरराष्ट्रीय समुदायाने पाकवर दबाव आणावा असं आवाहन केलं आहे. मीर म्हणाले की, 14 मे रोजी पाकिस्तानला पीओके रिकामे करण्यास सांगण्याच्या भारताच्या निर्णयाला बलुचिस्तान पूर्ण पाठिंबा देतो.