68 लाखाची रोकड, प्रायव्हेट फ्लाईट आणि सोबतीला तीन मित्रांना घेवून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषीराज सावंत बँकॉकच्या दिशने निघाले होते. त्याच वेळी त्यांच्या अपहरणाची बातमी समोर आली. त्यानंतर सर्व डावच पलटला. बँकॉकच्या दिशेने उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या ऋषीराज यांना चेन्नईच्या एअरपोर्टवरच ताब्यात घेण्याच आलं. त्यावेळी माजी मंत्र्यांच्या मुलाबरोबर काय झालं याची चर्चा जोरदार रंगली आहे. पण या निमित्ताने पुन्हा एकदा बँकॉकच का? याची ही चर्चा होवू लागली आहे. त्यामुळे पर्यटक बँकॉकलाच का जातात? तिथे पाहण्यासाठी काय काय आहे? तिथलं मुख्य आकर्षण काय? याची सर्व माहिती आपण पाहाणार आहोत.
बँकॉकची काय आहेत वैशिष्ट्य?
बँकॉक हे थायलंडच्या राजधानीचे शहर आहे. या शहरातील वेगवेगळी ठिकाणे, आकर्षणं आणि शहरातील जीवन हे पर्यटकांना भूरळ घालते. यात रॉयल राजवाडे, मंदिरे, संग्रहालये, नाईट लाईफ, शॉपिंग सेंटर, फ्लोटींग मार्गेट ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. बँकॉक हे जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी अंदाजे 22.7 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटक बँकॉकमध्ये येत असतात. न्यूयॉर्क, लंडन, पॅरिसनंतर पर्यटकांची पसंती ही बँकॉकला असते हे सर्वेतून समोर आले आहे. जगातील सर्वोत्तम शहर म्हणून बँकॉक शहराचा उल्लेख होतो.
ऐतिहासिक मंदिरांचा वारसा
बँकॉक शहरात मोठ्या प्रमाणात मंदिरं ही आहेत. भारतात जशी मंदिर आहेत, तशीच मंदिरं बँकॉकमध्ये पाहायला मिळतात. श्री महामरियम्मन हे त्यातीलच एक हिंदू मंदिर आहे. सुमारे 150 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आले होते. हे मंदिर उमा देवीच्या नावानेही ओळखले जाते. इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. हे मंदिर मरियम्मन देवीला समर्पित करण्यात आले आहे. मरियम्मा देवीला पार्वती आणि दुर्गेचे एक रुप मानले जाते. या मंदिरात गणपती आणि कार्तिकेय यांचीही छोटेखानी मंदिरे आहेत हे विशेष म्हणावे लागेल. बँकॉकच्या सिलोम भागात हे मंदिर आहे. या शिवाय अन्य ऐतिहासिक मंदिर बँकॉक शहरात आहेत. मंदिरां बरोबर वाट फो , ज्याला रिक्लाइनिंग बुद्धाचे मंदिर किंवा वाट फ्रा चेतुफोन असेही म्हणतात. हे बुद्ध मंदिर पर्यटकांना भूरळ घालते. हे शहरातील सर्वात जुने बुद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते. हे एमराल्ड बुद्ध मंदिर आणि ग्रँड पॅलेसच्या दक्षिणेस आहे. हे बँकॉकचे सर्वात मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते.
नाईटलाईफ आणि शॉपिंग
थायलंडम्हटलं की शॉपिंग ही आलीच. स्वस्त आणि मस्त शॉपिंगसाठी बँकॉक ओळखले जाते. इथं रस्त्यावरील बाजारपेठांपासून ते जागतिक दर्जाच्या लक्झरी मॉल्सपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. खेरेदीसाठी पर्यटकांची या बाजारपेठांना नेहमीच पसंती राहीली आहे. चतुचक वीकेंड मार्केट हे बँकॉकमधील सर्वात मोठे मार्केट ओळखले जाते. इथं खरेदीसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. या शिवाय बँकॉकमध्ये अजूनही काही फ्लोटींग मार्केट आहेत. म्हणजे पाण्यावर तरंगणारी बाजारपेठ आहे. इथं ही पर्यटकांना घेवून जातात. डॅमनोएन सदुआक हे सर्वात लोकप्रिय आणि जुने फ्लोटिंग मार्केट आहे. या शिवाय बँकॉकमध्ये 15 हून अधिक जागतिक दर्जाचे मॉल्स आहेत. त्यापैकी बरेच सुखुमविट रोड आणि प्लोएनचिट-रत्चाप्रसोंगभोवती केंद्रित आहेत. बँकॉकमध्ये अंदाजे 25 शॉपिंग मॉल्स, 35 लाइफस्टाइल शॉपिंग सेंटर्स, 40 डिपार्टमेंट स्टोअर्स, 55 सुपरस्टोअर्स आणि 1,100 पेक्षा जास्त सुविधा स्टोअर्स आहेत.
फुकेतचा स्वच्छ समुद्र किनारा
बँकॉकमधील नाईटलाईफ, शॉपिंग, बरोबरच पर्यटक बाजूलाच असलेल्या फुकेतलाही भेट देतात. हे एक रोमॅन्टीक स्थळ म्हणून ओळखलं जातं. नवविवाहीत इथं मोठ्या प्रमाणात फिरायला येता. स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा. लांबच लाबं पर्यंत दिसणारी हिरवीगार झालं हे इथलं वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे फुकेत मध्ये राहाणे खुप स्वस्त आहे. दोन ते तिन दिवस इथं पर्यटनाचा आनंद घेतात. इथला स्पा प्रसिद्ध आहे. वॉर स्पोर्टसाठीही फुकेतची ओळख आहे. या शहराच्या जवळ आणखी तीन चार बेटं आहे त्यांनाही भेट देता येते. त्यामुळे बँकॉक फिरल्यानंतर निवांतपणा अनुभवण्यासाठी पर्यटक फुकेतला जरूर भेट देतात. थायलंड देशात बँकॉकनंतर सर्वाधिक पर्यटक जाणाऱ्या शहरांपैकी एक शहर फुकेत आहे.
'पटाया'ची मौजमजा
बँकॉकनंतर पर्यटकांच्या सर्वात पसंतीला उतरणारं शहर जर कोणतं असेल तर ते पटाया हे आहे. पटाया हे शहर बँकॉकपासून जवळपास 165 किलोमिटर आहे. हे शहर कधीच झोपत नाही असं बोललं जातं. या शहराची नाईटलाईफ संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. इथलं वॉकींग स्ट्रीटवर जगभरातले पर्यटक दिसून येतात. या स्ट्रीटच्या दुतर्फा, क्लब, डिस्को, बार दिसून येतात. ते आहोरात्र सुरू असतात. शिवाय इथला समुद्र किनाराही पर्यटकांना भूरळ घालतो. शहराच्या स्ट्रीट हिल्टन पटाया बीच रोड वर सर्वात उंच इमारत आहे. या इमारतीच्या 34 व्या मजल्यावर होरिजन बार आहे. इथल्या बाल्कनित जावून संपुर्ण शहर पाहाण्याचा अनुभव तर काही औरच आहे. त्यामुळे जगातले पर्यटक इथं मौजमजा करण्यासाठी येत असतात. पाश्चिमात्य देशातील पर्यटकांबरोबरच भारतीय पर्यटकांची संख्या ही इथं वाढली आहे.
बँकॉकमधील काही पर्यटन स्थळे
ग्रँड पॅलेस
वाट अरुण आणि वाट फोसह बौद्ध मंदिरे
खाओसन रोड आणि पॅटपोंगच्या नाईटलाइफ
सफारी वर्ल्ड
ड्रीम वर्ल्ड
सी लाइफ बँकॉक
फॅन्टासिया लगून वॉटर पार्क